प्रमुख स्पर्धेत प्रत्येक गटातील 10 स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव : बेळगाव येथे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे 16 वी सिनीयर पुरुष शरीरसौष्ठव व महिला मॉडेल फिजिक स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात करण्यात आले. प्रत्येकी गटातील 10 शरीरसौष्ठवपटूंना अंतिम फेरीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. अंगडी कॉलेज मैदान, सावगांव रोड येथे स्पर्धेचे उद्घाटन आयबीबीएफचे अध्यक्ष स्वामी रमेशकुमार, वर्ल्ड शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव चेतन पाठारे, सचिव हिरल सेठ, मि. वर्ल्ड प्रेमचंद्र डिग्रा, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, मधुकर तळलकर, टी. व्ही. पॉली, भास्करन्, तुलशी सुजल, अजित सिद्दन्नावर, सुनील आपटेकर, बॉबी सिंग आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे स्वामी रमेशकुमार यांच्या हस्ते तर गणेशमूर्तीचे पूजन मधुकर तळवळकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ बेळगाव, कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर व बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.









