प्रतिनिधी / बेळगाव : हुबळी किम्स इस्पितळाचे डॉक्टर शस्त्रक्रियेमुळे चर्चेत असतात. या वेळी तर त्यांनी चक्क अवयवांचे ट्रान्सफर केले आहे. त्यामुळे याची चर्चा सर्वत्र होत आहे.
एका व्यक्तीच्या शरीरातील अवयव उलटे होते. उजव्या बाजूचे अवयव डाव्या बाजूला तर डाव्या बाजूचे उजव्या बाजूला. तसेच हृदयही उजव्या बाजूला होते.
पण डॉक्टर हेबसुर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली असून या अवयवांची अदलाबदल करण्यात आली आहे. कारवारच्या मुंडगोड येथील हजारी नामक व्यक्ती शास्त्रक्रियेनंतर व्यवस्थित आहेत.
अशी प्रकरण खूप कमी असतात. याला साईटस इन्व्हर्सस टोटॅलिस म्हणतात.