सांगे : सांगेतील नेत्रावली येथील अभयारण्य कक्षेतील मैनापी येथे रविवारी जी दुघर्टना घडली त्यातील पाय घसरून बुडून मृत्यूमुखी पडलेल्या शिवदत्त नाईक वय 27 वर्षे, वाडे – वास्को यांचा मृतदेह आज सकाळी सापडला. रविवारी मैनापी धबधब्यावर दोघेजण बुडाले होते. यापैकी जनार्दन सडेकर (56 वर्षे ) यांचा मृतदेह लवकरच हाती लागला होता तर शिवदत्त नाईक बेपत्ता होते. या धबधब्यावर एकाच दिवशी दोगाचा बुडून मृत्यू झाल्याने पर्यटकाच्या सुरक्षेचा प्रश्न एरनिवर आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून सरकारने खबरदारीच्या उपाय योजना आखण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. तर वन खात्याने आजपासून पर्यटकांना नेत्रावळी अभयारण्यातील सावरी, मैनापीसह इतर धबधब्यावर जाण्यासाठी तात्पुरती प्रवेश बंदी केल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी सकाळी नाईक यांचा मृतदेह तरगताना बचाव गटाला आढळून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह सुमारे 4.50 किलोमीटरचे अंतर पायपीट कऊन आणावा लागला. वास्तविक रविवारी रात्रं झाल्याने तसेच जंगली जनावरांचा धोका यामुळे शोध मोहीम थांबून सोमवारी सकाळी सुऊ करण्याचा निर्णय प्रसासनाने घेतला होता. परंतु सकाळीच त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी घातलेल्या जाळीला लटकल्याचे आढळून आले. रविवारी तीन जणांचा एक ग्रुप सकाळी मैनापी धबधब्यावर आला होता. तेथील नाईक हे पाय घसरून पाण्यात पडले आणि बुडाल्याची माहिती मिळाली होती. मृत नाईक यांच्या अंगावर कपडे, पायात बूट तसेच होते.
या घटनेने नेत्रावळीत हळहळ व्यक्त होत आहे. या दिवसात जोरदार पाऊस पडत असल्याने नेत्रावळी अभयारण्यातील धबधबे प्रवाहीत होऊन कोसळत आहे. पर्यटकांना त्याचा अंदाज येत नाही. धबधब्यावरून कोसळणारे पाणी खळखळून वाहत असल्याने पोहता येण्राया माणसाला येथे पोहणे शक्य होत नाही. त्यामुळेच रविवारी जनार्दन सडेकर यांना पोहता येत होते, तरी ते वाचू शकले नाही. दुस्रयाच्या मदतीला धावलेले सडेकर स्वत: मृत्यूमुखी पडले.
ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. जीवरक्षक, पोलीस ठेवण्याची गरज : सरपंच
नेत्रावळी ग्रामपंचायत सरपंच बुंदो वरक यांनी या घटनेवर दु:ख व्यत करून पर्यटकाची सुरक्षा महत्वाची म्हटले आहे. जरी हे धबधबे अभयारन्यात येत असले तरी अशा घटना घडल्यानंतर लोकं आम्हाला विचारतात. मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवारी पर्यटक येत असून रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करून ठेवत असल्याने वाहतूक जाम होते. त्यावर उपाययोजना काढणे गरजेचे आहे. तसेच वन खात्याने सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी आणि गाईड पुरविण्याची मागणी वरक यांनी केली आहे. तसेच नेत्रावळीत पर्यटन स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी वरक यांनी केली आहे.
उपसरपंच फ्रँसिस मसकॅरेंहास यांनी धबधबे हे निसर्गाचे देणे असून आपण पर्यटकांवर बंदी घालू शकत नाही. परंतु पर्यटकाची सुरक्षा घेणे महत्वाचे आहे. मुळात डोंगराळ भागातून हा धबधबा कोसळत असून मोठया प्रवाहाने आणि खळखळून पाणी वाहत असते. त्यामुळे केवळ पर्यटकांना धबधबे पाहण्यासाठी धावेत पण पाण्यात प्रवेश देऊ नये असे मत मसकॅरेंहास यांनी केले आहे. पर्यटनाच्या नावाखाली मौजमजा होता कामा नये. स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी. तसेच दर्जात्मक पर्यटन असावे यामताचा मी असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढती पर्यटकाची संख्या पाहता, संख्येवर नियंत्रण येण्यासाठी काही नियम आणि उपाययोजना आखण्याची गरज त्यांनी व्यत केली आहे. पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटताना स्वतच्या सुरशीततेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.









