पोलिसांकडून तपास सुरू
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडात काही दिवसांपूर्वी 20 वर्षीय भारतीय विद्यार्थी विषय पटेल बेपत्ता झाला होता. पश्चिम मॅनिटोबा शहरातून विषय बेपत्ता झाला होता. त्याच्या आईवडिलांनी शनिवारी ब्रँडन पोलिसांना याची माहिती दिली होती. यानंतर आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्याचा शोध सुरू केला होता. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी स्वत:च्या स्तरावर शोध चालविला होता. यादरम्यान मॅनिटोबा प्रांतातील ब्रँडन सिटीनजीक सिनबोइन नदीत एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह भारतीय विद्यार्थ्याचा असल्याचे पथकाचे मानणे आहे. विषय पटेलला एका कारमधून बाहेर पडताना पाहिले गेले होते. डीएनए चाचणीनंतर संबंधित मृतदेह विषय पटेलचा आहे की नाही याची घोषणा केली जाणार आहे. तर संबंधित मृतदेह हाती लागल्यावर पोलिसांनी मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत तपास सुरू केला आहे.









