आतापर्यंत तिघांना झाली अटक, दोघे फरारी
वार्ताहर /घटप्रभा
गोकाक येथील उद्योजक राजेश सत्यनारायण झंवर यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले. गुऊवारी रात्री 11 वाजता तालुक्यातील पंच नायकनहट्टी गावाजवळील कालव्यातील एका ख•dयात सदर मृतदेह आढळून आला. याप्रकरणी आतापर्यंत डॉ. सचिन शंकर शिरगावी रा. गोकाक, डॉ. शिवानंद काडगौडा पाटील रा. शिरढाण, ता. हुक्केरी, शापत त्रासगार, रा. लक्कट गल्ली यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोघे आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गत सात दिवसांपासून गोकाक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या उद्योजक राजेश झंवर (वय 53) यांच्या अपहरण-खून प्रकरणी गोकाक पोलिसांनी सिटी स्कॅन
हॉस्पिटलचे डॉ. सचिन शिरगावी यांना अटक केली होती. तपासात पैशाच्या देवाणघेवाणीतून राजेश झंवर यांचा खून करून मृतदेह घटप्रभा नदीच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याचे डॉ. शिरगावी यांनी पोलिसांना सांगितले होते. घटनास्थळी बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजय पाटील यांनी भेट देऊन मृतदेहाच्या तपासासाठी तीन डीवायएसपी व उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करून तपासकार्य हाती घेतले होते. गुऊवार दि. 16 रोजी रात्री 11 वा. राजेश झंवर यांचा मृतदेह घटप्रभा नदीच्या उजव्या कालव्याचा पोट कालवा पंच नायकनहट्टीजवळील ख•dयात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन झंवर यांच्या नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर इस्पितळात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. शुक्रवारी दुपारी 3 वा. राजेश झंवर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.