वृत्तसंस्था/ पेट्टा
केरळमध्ये पेट्टा रेल्वेस्थानकानजीक इंटेलिजेन्स ब्युरोच्या एका 24 वर्षीय महिला अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. पथानामथिट्टाच्या कूडल येथील रहिवासी असलेल्या मेघा या पेट्टा येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या. मेघा यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पेट्टा रेल्वेस्थानकानजीक महिला अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. महिलेला रेल्वेमार्गावर उडी घेताना पाहिले होते असे रेल्वेच्या लोको पायलटकडून सांगण्यात आले आहे. यामुळे हे प्रकरण आत्महत्येचे असण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. तरीही सर्व शक्यता विचारा घेत पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.









