दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज
कोल्हापूर : न्यू महाद्वार रोडवरील इमारतीमध्ये तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळून आला. रोहन रविंद्र पेडणेकर (वय ४६ रा. महादेव गल्ली, न्यू महाद्वार रोड) असे मृताचे नांव आहे. रोहन पेडणेकर यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव गल्ली येथील इमारतीमध्ये रोहन पेडणेकर राहतात. त्यांचा रेकॉर्डीग स्टुडिओ आहे. त्यांच्या पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेल्या आहेत. मंगळवारी (१४ ऑक्टोंबर) रोजी दुपारी रोहन यांचा भाउ अभिनंदन याने रोहन यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहनने दार उघडले नाही. रोहन झोपला असेल असा समज करुन अभिनंदन तेथून निघून गेले. गुरुवारी दुपारी आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे घटना उघडकीस आली
३ वाजण्याच्या सुमारास फ्लॅटमधून मोठी दुर्गंधी येत असल्याने अभिनंदन याची माहिती भाउ आशिषला दिली. या दोघांनी रोहनच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून बघितला असता, तो मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करुन मृतदेह शेंडा पार्क येथे नेला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. रोहनच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी, दोन उभा असा परिवार आहे. दरम्यान डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, या रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे








