परिवाराने घेतला निर्णय
ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची अंत्ययात्रा पाहून लोक अवाक् झाले. संबंधित इसमाचे शव दफन करण्यासाठी नेले जात असताना पाहिलेले दृश्य लोकांना चकित करणारे होते. या व्यक्तीची शवपेटी एखाद्या चॉकलेटप्रमाणे दिसून येत होती. चॉकलेट आणि कँडीचा शौकीन असलेला ब्रिटिश व्यक्ती नेहमीच थट्टेच्या सुरात मला चॉकलेटच्या डब्याच्या आकारातील शवपेटीत ठेवूनच दफन करा असे म्हणायचा. त्याच्या मृत्यूनंतर परिवाराने देखील असेच केले आणि त्याची अंतिम इच्छा पूर्ण झाली. त्याला प्रतिष्ठित चॉकलेटच्या डब्याच्या मॉडेलप्रमाणे निर्माण करण्यात आलेल्या बॉक्समध्ये दफन करण्यात आले.
पॉल ब्रूम नावाचा इसम एका ओल्डएज होममध्ये देखभाल सहाय्यक म्हणून काम करत होता. तो अनेकदा स्वत:च्या या अजब विचाराचा उल्लेख करायचा. त्याचा हा विचार ऐकून मित्र आणि परिवाराच्या सदस्यांना त्यावेळी हसणे आवरत नसायचे.
लोकांच्या चेहऱ्यावर आणत होता हास्य
ब्रूम एक हसमुख व्यक्ती होता, तो नेहमीच लोकांना हसवत राहायचा आणि चेष्टा करायचा, जेणेकरून लोक त्याच्या या कृत्यामुळे हसत-आनंद रहावेत. तसेच त्याला कँडी, चॉकलेट आणि टॉफी अत्यंत पसंत होत्या. तो स्वत:ही खायचा आणि इतरांनाही खायला देत होता असे परिवाराच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.
परिवाराला वाटली होती थट्टा
ब्रूमने स्वत:च्या परिवाराला माझ्या मृत्यूनंतर चॉकलेटच्या डब्याच्या आकारातील शवपेटीत ठेवूनच दफन करा असे सांगितले होते. परंतु त्याचा परिवार याला चेष्टा समजून नाकारत होते. परंतु ब्रूमच्या मृत्यूनंतर त्याची ही इच्छा पूर्ण करण्याचा विचार कुणाला सुचला नाही.
मृत्यूपत्रात अंतिम इच्छा
ब्रूमच्या मृत्यूनंतर त्याचे मृत्युपत्र उघडून पाहिले असता त्यात त्याने स्वत:च्या अंतिम इच्छेविषयी लिहिल्याचे आढळून आले. मग त्याच्या परिवाराने ब्रूमच्या या काहीशा विचित्र इच्छेला पूर्ण कण्याचा निर्णय घेतला. शोकाकुल नातेवाईकांनी ब्रूमला एका चॉकलेट बारसारख्या दिसणाऱ्या शवपेटीत ठेवून दफन केले. तसेच ब्रूमच्या विनोदबुद्धीला सन्मान देत एका बाजुला ‘मी वेडा आहे’ असे लिहिण्यात आले आहे. अंत्यसंस्कारावेळी ब्रूमच्या मित्रांनी त्याच्या सांगण्यानुसार टी-शर्ट परिधान करत टाळ्या वाजून श्रद्धांजली वाहिली.









