सातारा :
सातारा शहरातील माची पेठेत साई धाम मंदिराच्या परिसरात पुरातन 200 वर्षापूर्वीची विहीर आहे. या विहिरीतून गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कुबट वास स्थानिकांना आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत सडलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना निदर्शनास आला. त्याची माहिती स्थानिकांनी सातारा शहर पोलिसांना दिली.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हात्रे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होवून त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांना बोलवले होते. मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अद्याप त्याची ओळख पटलेली नव्हती.








