‘हरि हारा वीरा मल्लू’ चित्रपटात साकारणार भूमिका
दाक्षिणात्य चित्रपट ‘हरि हारा वीरा मल्लू’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटातील भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानले जात आहे. चित्रपटात पवन कल्याण आणि निधी अग्रवाल मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर बॉबी देओलही यात दिसून येणार आहे.
दिग्दर्शक कृष जगरलामुदी यांच्या या चित्रपटातून बॉबी देओल दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. बॉबी यात औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबादमध्ये सुरू झाले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीता काम करण्याची माझी इच्छा होती. चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. तसेच सुपरस्टार पवन कल्याणसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने स्वतःच्या सुदैवी मानत आहे. चित्रपटाचे निर्माते ए.एम. रत्नम आणि दिग्दर्शक कृष जगरलामुडी यांनी यापूर्वी अनेक उत्तम चित्रपट तयार केले आहेत. अशाप्रकारच्या उत्तम टीमसोबत जोडले जाण्याचा अनुभव अत्यंत चांगला असल्याचे बॉबीने म्हटले आहे.
मेगा सूर्या प्रॉडक्शनच्या अंतर्गत हा चित्रपट तयार केला जात आहे. ‘हरि हारा वीरा मल्लू’ हा एक पॅन-इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळी आणि हिंदी प्रदर्शित होणार आहे.









