रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे खाडीत सकाळी १० वाजता बोट बुडाल्याची घटना घडली आहे. यावेळी बोटीत एकूण पाच जण होते. त्यापैकी चार जणांना वाचवण्यात यश आले असून, एकजण बुडाला आहे. राजीवडाखाडीच्या मुखावर मोठ्या प्रमाणावर गाळ साचाललेला आहे. या गाळामुळे ही बोट बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करारावर घेतलेली मासेमारी बोट राजीवडा येथून जयगड येथे घेऊन जात असताना मोठी लाट आल्याने बोट पलटी होऊन 5 जण बुडाले होते. यामध्ये ओवेस मक्खी (वय-21), नईम शेख (वय- 21),
उजेला मुल्ला (वय-21), आफशान मेहबुब मुजावर (वय- 22), ऐयाज माखजनकर (वय- 38) अशी नौकेवर असलेल्यांची नावे आहेत. यातील ओवेस मक्खी हा तरुण अद्याप सापडलेला नाही.
राजिवडा येथील इमरान सोलकर याच्या मालकीची एम इब्राहिम (मिनी पर्सनेट) पर्ससीन मासेमारी नौका जयगड येथे घेऊन जाण्यासाठी ओवेस मक्खी, नईम शेख, उजेला मुल्ला, आफशान मेहबुब मुजावर, ऐयाज माखजनकर हे जयगड येथून राजीवाडा येथे आले होते.
खलील सोलकर यांनी इमरान सोलकर यांच्याकडून एम इब्राहिम हि मिनी पर्सनेट नौका करारावर घेतली होती. ही नौका घेऊन ते जयगडला जात होते. पण जाताना मोठी लाट आली व बोट उलटली बोटीतील 4 खलाशी वाचले व एका खलाशी बुडाला.
Previous ArticlePanhala Fort: किल्ले पन्हाळगडाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात
Next Article मणेरी येथे एसटी बसला अपघात









