सांगली : कृष्णा नदी पात्रात काल होड्यांच्या शर्यती लावण्यात आल्या होत्या. मात्र अचनाक शर्यती दरम्यान स्पर्धकांची बोट उलटली. मात्र यात कोणाची जिवीतहाणी झाली नाही. नदी पात्रात पडलेले स्पर्धक पोहत काठावर आले. पण बोटीला जलसमाधी मिळाली. मात्र बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण होता. याचा व्हिडिओ काल सोशल मिडियावर शेअर झाला होता. होड्यांच्या शर्यतींचा हा थरार पाहण्यासाठी कृष्णाकाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
सायंकाळी पाचला स्पर्धेला सुरवात झाली. आयर्विन पुलाजवळ समांतर पुलाचे काम सुरू असल्याने पाण्याला मोठ्या प्रमाणावर ओढ होती. त्यात अत्यंत चुरशीने सामने झाले. माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीवाडीतील फ्रेंड्स यूथ फाउंडेशन, रणसंग्राम मंडळ आणि जिल्हा रोईंग असोसिएशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील नऊ बोट क्लब या स्पर्धेत सहभागी झाले होते.
Previous ArticleCM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यात पक्षबांधणीला सुरुवात; महिला आघाडीला मिळणार संधी
Next Article भारतीयांची उंची होतेय कमी








