दापोली :
तालुक्यातील आंजर्ले खाडीत उभी असलेली विघ्नहर्ता ही बोट अतिवृष्टी व व्रायामुळे खाडीच्या पाण्यात कलंडून फुटली. या बोटीचे मालक हर्णै येथील किसन कुलाबकर यांचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होत असल्यामुळे अनेक नौकांनी आंजर्ले खाडीचा आधार घेतलेला आहे. विघ्नहर्ता ही बोट देखील आंजर्ले खाडीत उभी होती. मात्र सोमवारी वाऱ्याने व पाण्याच्या जोरदार लोंढ्यामुळे ही बोट खाडीमध्ये कलंडली.
कुलापकर यांची ही एकमेव बोट होती. या बोटीवर त्यांची पूर्ण उपजीविका अवलंबून होती. ही बोट दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे त्यांच्यासमोर उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. मत्स्य विभागाच्या परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी पंचनामा केला आहे.








