नवी दिल्ली :
खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेची बिगर बँकिंग सहकारी कंपनी एचडीबी फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांना संचालक मंडळाने आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी दिली आहे. एचडीबी फायनॅन्शियलचा आयपीओ बाजारात सादर केला जाणार असून या अंतर्गत 2500 कोटी रुपयांची उभारणी ताजे समभाग सादर करून केली जाणार आहे. यामध्ये समभागधारकांचे समभाग हे ऑफर फॉल सेलअंतर्गत सादर केले जातील. सदरचा आयपीओ येत्या डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदरची कंपनी पर्सनल लोन, गोल्ड लोन, बिझनेस लोन आणि ऑटो लोन सारख्या कर्ज सुविधा देते.









