नवी दिल्ली :
बीएमडब्लू इंडियाने आपल्या एक्स 3 डिझेल श्रेणीतील नवीन प्रीमियम प्रकारामध्ये एक्स3, एक्स ड्राईव्ह 20 डी एम स्पोर्ट्स कार भारतीय बाजारात सादर केली आहे. कंपनीने प्रीमियम एसयूव्ही सेगमेंट कारच्या या मॉडेलची एक्स शोरुमची किमत 69.90 लाख रुपये ठेवली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सध्याच्या 20 डी लक्झरी मॉडेलपेक्षा ही गाडी 2.6 लाख रुपयांनी अधिक असल्याचेही सांगितले असून कंपनीने एक्स3चे पेट्रोलचे मॉडेल बंद केल्याचेही स्पष्ट केले आहे.
स्पोर्टी फ्रंट व रियर बंपरसह एम स्पोर्टची बाह्या रचना एक्स3 20 डी लक्झरी आवृत्तीपेक्षा अधिक स्टाईलिश दिसते. यासह ब्लॅक आउट रुफ रेल आणि डिफ्यूझर, निळ्या ब्रेक कॅलिपरसह 20 इंच अलॉय व्हील आणि चारही खिडक्यांच्या आसपास ब्लॅक आउट फ्रेम्स कारला वेगळा लूक दिला आहे. सदरची गाडी ही ब्लॅक सॅफायर, सोफिस्टो ग्रे ब्रिलियंट इफेक्ट, फायटोनिक ब्लू आणि मिनरल व्हाईट कलर पर्याय आहेत.
फिचर्स
?केबिनमध्ये एम स्पेक लेदर स्टीयरिंग व्हीलसह 12.3 इंच टचस्क्रीन
?360डिग्री कॅमेरा, हरमन कार्डन साउंड सिस्टम मिळणार
?थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, अॅम्बियंट लाइटिंग
?अॅपल कार प्लेसह अँड्राईड ऑटो, पार्क असिस्टंट प्लस, मेमरी आदी सुविधा मिळणार








