एम 1000 आरआर मॉडेल बाजारात
नवी दिल्ली :
बीएमडब्ल्यू इंडियाकडून भारतात नवीन एम 1000 आरआर स्पोर्ट्स बाईक सादर करण्यात आली आहे. या दुचाकीमध्ये 7 रायडिंग मोड्स, स्विच करण्यायोग्य एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. एम 1000 आरआर ही बीएमडब्ल्यूची भारतामधील सर्वात महाग आणि शक्तिशाली स्पोर्ट्स दुचाकी राहणार आहे. भारतीय बाजारात नुकत्याच सादर झालेल्या ड्यूकॅटी पॅनिजल व्ही 4 यासोबत स्पर्धा करणार आहे. एम 1000 आरआर दुचाकी ही एस 1000 आर आरची अद्ययावत आवृत्ती आहे. एम 1000 आरआरची सुरुवातीची किंमत 49 लाख रुपये राहणार आहे.
कंपनीने सदरच्या इंजिनला 6 स्पीड गिअरबॉक्ससह ट्यून केले आहे. बाईक 3.1 सेकंदात 0 ते 100 केएमपीएचपर्यंत स्प्रिंट करु शकणार असल्याचा दावा कंपनीचा आहे.









