नवी दिल्ली :
बीएमडब्लू मोटरसायकलने भारतात आपली फ्लॅगशिप अॅडव्हेंचर मेटरसायकल आर 1300 जीएस सादर केली आहे. कंपनीने यावेळी दावा केला आहे की, ही दुचाकी 200 किमी प्रति तास इतका वेग प्राप्त करु शकेल. लक्झरी आणि प्रीमियम दुचाकी निर्मात्याने किट आणि उपकरणावर आधारीत 5 प्रकारांमध्ये ही गाडी लाँच केली आहे. दुचाकी लाइट व्हाईट, ट्रिपल ब्लॅक 1, ट्रिपल ब्लॅक 2, ट्रॉफी आणि 719 मध्ये उपलब्ध झाली आहे. सदरच्या गाडीची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 20.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी सध्याच्या आर 1250 जीएस दुचाकीच्या सुरुवातीच्या किमतीपेक्षा 40,0000 रुपये जादा आहे.









