चेन्नई
तामिळनाडूत भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजप आयटी शाखेच्या 13 पदाधिकाऱयांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अनेक वर्षापर्यंत भाजपचे काम केले. परंतु मागील काही दिवसांपासून पक्षातील असामान्य स्थिती पाहता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजप आयटी शाखेचे जिल्हाध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले आहे. अनबरासन यांच्यासोबत आयटी शाखेच्या आणखी 12 पदाधिकाऱयांनी राजीनामा दिला आहे. तर रविवारी भाजप तामिळनाडू शाखेचे आयटी विभागाचे प्रमुख सी.टी.आर. निर्मल कुमार यांनी राजीनामा दिला होता. निर्मल कुमार यांनी तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांच्यावर टीका केली होती. निर्मल कुमार यांनी अण्णाद्रमुकचे अंतरिम प्रमुख के. पलानिसामी यांची भेट घेत त्या पक्षात प्रवेश केला आहे.









