एली रोथ यांच्या दिग्दर्शनात तयार ‘ब्लडी थँक्सगिव्हिंग’ चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. हा चित्रपट 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. रहस्यपट असलेला ब्लडी थँक्सगिव्हिंगमध्ये ब्लॅक फ्राइडेच्या दंगलीच्या दु:खद अंतानंतर प्लायमाउथ, मॅसाच्युसेट्समध्ये दहशत निर्माण करणाऱ्या मारेकऱ्याची कहाणी दर्शविण्यात आली आहे.
ब्लडी थँक्सगिव्हिंग ह चित्रपट तयार करण्याची प्रक्रिया मोठी राहिली आहे. पटकथा अचूक ठरावी म्हणून अत्यंत बारकाईने काम करण्यात आल्याचे रोथ यांनी सांगितले आहे. या चित्रपटात प्लायमाउथ आणि मॅसाच्युसेट्सची पार्श्वभूमी दर्शविण्यात आली आहे. येथे समुदाय एका दु:खद ब्लॅक फ्रायडे दंगलीच्या पार्श्वभूमीवर सुटीची भावना पुन्हा जागविण्याचा प्रयत्न करत असल्याचे परंतु एक रहस्यमय मारेकरी थँक्सगिव्हिंग थीमयुक्त पद्धतींचा वापर करत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. चित्रपटाची कहाणी जेफ रेंडेल यांची आहे. चित्रपटात पॅट्रिक डेम्प्सी, एडिसन राय, जालेन थॉमस ब्रूक्स, मिलो मॅनहेम, नेल वेरलाक, जीना गेर्शोन, टिम डिलन आणि रिक हॉफमॅन हे कलाकार दिसून येणार आहेत. स्पायग्लास मीडिया, रोजन बिर्नबाम आणि एली रोथ यांनी याची निर्मिती केली आहे.









