रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी शहरानजिकच्या मजगांव येथील दोन तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या तरुणांच्या आवाहनाला रत्नागिरीतील नागरिकांनी प्रतिसाद देत हे रक्तदान शिबिर यशस्वी करून दाखवले.
मजगांव येथील फैज मुकादम आणि शैजान मापारी या दोन तरुणांनी पुढाकार घेऊन रत्नागिरी येथील शासकीय सामान्य रुग्णालय येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सामजिक कार्याची आवड असलेल्या या दोघा तरुणांनी रक्तदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. रक्त दात्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दाखवला. या रक्तदान शिबिरात चांगल्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले आहे.








