वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळाकडून सलग ११व्या वर्षीही आयोजन
चौके : प्रतिनिधी
चौके येथील वावळ्याचे भरड, भराडी कला क्रीडा विकास मंडळ,चौके (रजि.नं एफ ४३६१) यांच्यावतीने सलग ११ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २६ आँक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत मंडळाच्या कार्यालयात आयोजित केले आहे.रक्तदान देईल जीवदान . चौके व पंचक्रौशीतील इच्छूक रक्तदात्यानी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करून सहकार्य करावे.असे आवाहन वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळ चौके यांच्यावतीने करण्यात आले आहे.









