रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी शहर मंडळ आणि जिल्हा कार्यालय यांच्या वतीने उत्स्फूर्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
हा कार्यक्रम मा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. शिबिराचे आयोजन शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात एकूण ६१ महिला व पुरुष रक्तदात्यांनी आपली रक्तदानाची सेवा उत्स्फूर्तपणे दिली. शिबिरात महिला मोर्चा, युवा मोर्चा, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महिला मोर्चाच्या अध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी रक्तदान करून केली. यावेळी अनेक महिलांनीही रक्तदान करीत समाजासाठी आपले योगदान दिले.
या उपक्रमामुळे समाजात सेवा आणि बांधिलकीची भावना वृद्धिंगत होत असून, संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. विशेष आभार संदीप उर्फ बाबू सुर्वे, निलेश आखाडे, विक्रम जैन आणि आपल्या कार्यालयातील मयेकर यांचे मोलाचे योगदान या कार्यक्रमात लाभले.
दादा ढेकणे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष








