कळे / वार्ताहर
सालाबाद प्रमाणे याहिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जय हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चिंचवडे यांचेवतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले ज्यामध्ये महिलांचाही सहभाग होता.
सलग तिसऱ्या वर्षी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शासकीय रक्तपेढी सी. पी. आर. हॉस्पिटल यांचेकडून रक्त संकलन करण्यात आले. यावेळी रक्तपेढीचे डॉ. केदार सर, जनसंपर्क अधिकारी श्री कदम सर तसेच त्यांची सर्व टीम हजर होती. मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील व उपाध्यक्ष श्री गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य व सर्व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी हजर होते.









