सावंतवाडी/प्रतिनिधी-
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने उस्फुर्त रक्तदान शिबिराचे आयोजन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले. यावेळी पंधराहून अधिक कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांनी रक्तदान केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ अनामिका जाधव, चव्हाण, सहाय्यक कार्यकारी अभियंता अनिल आवटी आदीसह विजय चव्हाण, राजन चव्हाण, सीमा गोवेकर, विनय रणशूर, अर्चना गोसावी, स्वरा राऊळ, शितल कर्पे, निकिता नाईक, पूजा राणे, सचिन सावंत, सुरेश गावडे, वैभव गोठणकर, शैलेश राणे, ऋषी जाधव, शशिकांत मोरजकर, अमोल बिराडे, विनय रणशूर, प्राची नाटेकर, अमोल सोपन आदी उपस्थित होते.