Blood Donation Camp at Malvan by Abhalmaya Group
कोरोना महामारीच्या काळात वराड गावात आभाळमाया ग्रुपने सुरू केलेली रक्तदानाची चळवळ आता कट्टा पंचक्रोशीच्या बाहेर मालवतालुक्यात पसरली आहे..
आभाळमाया ग्रुपने मागील वर्षी २२१ रक्तदात्यांचे रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श प्रस्थापित केला आणि तरुण वर्गाला जास्तीतजास्त रक्तदान कार्यात सक्रिय करून घेतले. तसेच रुग्णाच्या गरजेवेळी जिल्ह्यात, मुंबई आणि गोवा राज्यात लाईव्ह रक्तदान केलेले आहे. यावर्षी देखील २७ नोव्हेंबर २०२२ ला सहकारमहर्षी कै. प्रा. डी.बी. ढोलम साहेब यांच्या पुण्यतीथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले असून आपण सर्वांनी या सत्कार्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर राजकारण विरहित राहील याची आम्ही काळजी घेत आहोतअसेही आभाळमाया ग्रुपने स्पष्ट केले आहे.
मालवण / प्रतिनिधी









