वेंगुर्ले (वार्ताहर)-
रोजारी युथ ग्रुप, उभादांडा मित्र मंडळ व कार्मीस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १७ वर्षे सर्वांच्या सहकार्याने दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उभादांडा शाळा नं २ येथे १८ वे भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे.
गेली १७ वर्षे रोजारी युथ ग्रुप व उमादांडा मित्र मंडळमार्फत गोरगरीब लोकांना, रक्तदात्यांच्या सहकार्याने आजपर्यंत रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजून हजारों लोकांना गरजेनुसार मोफत रक्त पुरवठा केला आहे. या रक्तदान शिबीरांतही रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे. तसेच याच उभादांडा शाळा नं. २ येथे महिलांची तपासणी ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी, डोळे तपासणी, रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, कान, नाक, घसा तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री PMJAY कार्ड ची नोंदणी यावेळी करण्यात येणार आहे. याचा लाभ उभादांडा गावातील जनतेने बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन रोजारी युथ ग्रुप, उभादांडा मित्र मंडळ व सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांनी केले आहे.









