प्रतिवषी हजारो युनिट रक्ताचे संकलन : रक्तदान करण्यासाठी जागृती
प्रतिनिधी /बेळगाव
रुग्णाला रक्ताची गरज लागली की आठवण होते ती रक्तपेढीची. कर्नाटकातील हायटेक रक्तपेढय़ा बेळगावमध्ये आहेत. दरवषी हजारो युनिट रक्ताचे संकलन केले जाते. रुग्णाला तात्काळ रक्त उपलब्ध होत असल्यामुळे आजवर हजारो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. रक्तदान करण्यासाठी रक्तपेढय़ांकडून जागृती करण्यात येत आहे.
14 जून हा दिवस जगभरात जागतिक रक्तदाता दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी रक्तदान करणाऱया सर्वांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. एखाद्या व्यक्तीने रक्तदान केल्यानंतरच दुसऱया व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे रक्तदानाविषयी जागृती केली जाणार आहे. यावषी ‘रक्तदान करणे हे एकतेचे प्रतीक आहे, सहभागी व्हा, जीव वाचवा’ हे घोषवाक्मय ठरविण्यात आले आहे.
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त केएलई ब्लडबँकेने अनोखा उपक्रम राबविला आहे. प्रत्येक रक्तदात्यासाठी त्यांनी एक शपथ तयार केली आहे. भारत हा एक विशाल देश असून मी असे वचन देतो की माझा परिवार, मित्र मंडळी, नातेवाईक, सहकारी आणि जनतेमध्ये रक्तदानाविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करेन, तसेच ज्या-ज्या वेळी रक्ताची गरज असेल तेव्हा स्वखर्चाने कोणत्याही जाती-पातीचा विचार न करता रक्तदान करेन, यामुळे रक्ताविना कुठल्याही नागरिकाचा जीव जाणार नाही याची खबरदारी मी घेईन, अशी शपथ केएलईतर्फे तयार करण्यात आली आहे.
नागरिकांनी केलेल्या रक्तदानातील 95 टक्के कॉम्पोनंट प्रिपरेशन केले जाते. यामध्ये प्लेटलेट प्रिपरेशन, रेडसेल प्रिपरेशन, प्रेश फ्रोजन प्लाज्मा, क्रायोप्रेसीपिटेंट अशा विविध वर्गवारीत रक्ताचे वर्गिकरण केले जाते. केएलई ब्लड सेंटर लवकरच ग्लॅनोसायट्स, मोनोन्यूक्लिअर सेल्स, पेरिफेरल स्टीमसेल प्रिपरेशन सुरू करणार आहे. 240 थॅलेसेमिया रुग्ण, 130 हेमोफिलिया रुग्णांसाठी 250-300 युनिट रक्त मोफत दिले जाते.
वर्षभरात 100 हून अधिक रक्तदान शिबिरे
बेळगाव परिसरात अनेक युवक मंडळे, गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्थांकडून दरवषी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनामध्ये ही शिबिरे होऊ शकली नाहीत. त्यामुळे रक्ताचा बऱयाच प्रमाणात तुटवडा जाणवत होता. कोरोनानंतरच्या काळात रक्तपेढय़ांनी शिबिरांचा झपाटा लावला आहे. दरवषीप्रमाणे यावषीही 200 हून अधिक रक्तदान शिबिरे घेण्यात आली आहेत.
केएलईसोबतच बेळगाव ब्लड बँक, महावीर ब्लड बँक यांचे कार्यदेखील महत्त्वाचे आहे. लोकमान्यतर्फे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर, शनैश्वर ट्रस्टतर्फे शिबिर घेतले जाते. यातून शेकडो युनिट रक्त संकलित होते. रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी, प्रसूतीसाठी जशी गरज असेल तसे रक्त दिले जाते. डायलेसीससाठी रक्ताची गरज भासत आहे. रक्तदात्यांचा सहभाग वाढला तर जीव वाचणार असून त्यानंतरच हे घोषवाक्मय साध्य होणार आहे.
मुख्य उद्देश
1) लोकांमध्ये ऐच्छिक, विनामूल्य रक्तदान करण्यासाठी जागरुकता निर्माण करणे.
2) वर्षभर ठरवून रक्तदान करणे, जेणेकरून वेळेवर रक्त देण्यासाठी पुरेसा पुरवठा असेल.
3) समुदायांमध्ये एकी आणि सौहार्द वाढविण्यासाठीसुद्धा ऐच्छिक विनामूल्य रक्तदान उपयोगी ठरते.
4) राष्ट्रीय रक्तप्रणाली तयार करणे.









