पॅन्टोन्मेंटला हवे जलवाहिन्या घालण्यासाठी भाडे : सहा किलोमीटर जलवाहिनी जातेय वनखात्याच्या हद्दीतून
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा राबविण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, जलवाहिन्या घालण्यासाठी पॅन्टोन्मेंटला हवेत वर्षाला 62 लाख भाडे आणि सहा किलोमीटर जलवाहिनी घालण्यासाठी वनखात्याकडून परवानगी मिळत नसल्याने जलवाहिन्या घालण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. पॅन्टोन्मेंट आणि वनखात्याच्या आडकाठीमुळे जलवाहिन्या घालण्याचे काम रखडले आहे. शहर आणि उपनगरांत 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी एलअँडटीकडून जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या जलकुंभ उभारणीसह जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रापासून शहर आणि उपनगरांत उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्याकरिता पॅन्टोन्मेंटकडून परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी आठ महिन्यांपासून पॅन्टोन्मेंट बोर्डकडे अर्ज करण्यात आला आहे. पण विविध कारणास्तव पॅन्टोन्मेंट बोर्डने परवानगी देण्यास टाळाटाळ चालविली आहे. प्रारंभी 24 तास पाणी योजनेचा प्रस्ताव देण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर ऑनलाईनद्वारे परवानगीसाठी अर्ज करण्याची सूचना पॅन्टोन्मेंटने केली. त्यानुसार एलअँडटी कंपनीकडून पाठपुरावा करण्यात आला. तरीदेखील पॅन्टोन्मेंटने परवानगी दिली नाही. ज्या रस्त्यावरून जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव होता, त्या रस्त्यावर जलवाहिनी घालण्यास नकार देऊन अन्य रस्त्यांचा पर्याय सुचविला. त्या पर्यायाला देखील एलअँडटी कंपनीने होकार दिला. इतके करूनही पॅन्टोन्मेंट बोर्डने जलवाहिन्या घालण्यास परवानगी दिली नाही.
जलवाहिन्या घालण्याचे काम रखडले
आता परवानगीसाठी वर्षाला 62 लाख ऊपये भूभाडे भरण्याची सूचना कंपनीला केली आहे. वास्तविक पाहता रस्त्यांची खोदाई केल्यानंतर पुन्हा दुऊस्ती करण्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीने घेतली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात दुऊस्तीचे काम निघाल्यास रस्त्यांची दुऊस्ती व पुन्हा डांबरीकरण करण्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीने घेतली आहे. तरीही वर्षाकाठी 62 लाख ऊपये भरावे लागणार असल्याची अट पॅन्टेन्मेंटने घातली आहे. त्यामुळे जलवाहिन्या घालण्याचे काम रखडले आहे. हिडकल ते बसवनकोळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. 2006 मध्ये या मार्गावरील जलवाहिन्या घालण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी सिमेंटच्या पाईप असल्याने वारंवार गळती लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे 9 किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्याची तरतूद 24 तास पाणी योजनेत करण्यात आली आहे. त्याकरिता सर्व तयारी एलअँडटी कंपनीने केली आहे. मात्र, 9 किलोमीटरपैकी सहा किलोमीटरची जलवाहिनी वनखात्याच्या हद्दीतून जाते. जलवाहिन्या घालण्यासाठी एलअँडटी कंपनीने वनखात्याकडे परवानगी मागितली आहे. पण वनखात्यानेही परवानगी देण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे जलवाहिन्या घालण्यात अडथळा निर्माण झाला आहे. जलवाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार नादुऊस्त होण्याचा प्रकार वाढला आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठा नियोजनावर होत आहे. पॅन्टोन्मेंट आणि वनखात्याने जलवाहिन्या घालण्याकरिता परवानगी दिल्यास शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करता येणार आहे. मात्र, पॅन्टोन्मेंट आणि वनखात्याच्या असहकार्यामुळे जलवाहिन्या घालण्याचे काम रखडले आहे.









