वृत्तसंस्था / नादीयाड
गुजरातमधील नादीयाड येथे शनिवारी अंधांच्या 23 व्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेला मोठ्या थाटात प्रारंभ झाला. सदर स्पर्धा अखिल भारतीय अंधांच्या क्रीडा संघटनेतर्फे प्रत्येक दोन वर्षांने भरविली जाते.
या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील सुमारे 150 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला आहे. सदर स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. पुरुष आणि महिला अशा दोन विभागात सदर स्पर्धा घेतली जाणार असून धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, बुद्धिबळ व अन्य काही क्रीडा प्रकारचा यामध्ये समावेश आहे.









