चमकदार त्वचेसाठी किंवा टँनिंग घालवण्यासाठी अनेकदा ब्लीच करण्याचा सल्ला दिला जातो. पण बाजारात मिळणारे ब्लीच हे केमिकल मिसळून तयार केले जाते. ज्याचा चेहऱ्यावर वाईट परिणाम दिसून येतो.बऱ्याच वेळेला चेहऱ्यावर काळे डाग दिसून येतात. म्हणूनच चेहऱ्यावर जर झटपट चमक आणायची असेल तर घरीच ब्लीच तयार करा.जे केमिकलशिवाय बनवता येईल आणि तुमचा चेहरा लगेच उजळेल.चला तर मग जाणून घेऊया घरी ब्लीच कसं तयार करायचे.
घरी ब्लीच बनवण्यासाठी तुम्हाला पपई, कच्चे दूध, बटाटा, बीटरूट आणि लिंबाचा रस लागेल.यासाठी प्रथम पपईचे काही तुकडे घ्या आणि ग्राइंडरमध्ये पेस्ट बनवा. नंतर त्यात काही बटाट्याचे तुकडे आणि बीटरूटचे तुकडे बारीक करा. नंतर त्यात लिंबाचा रस घाला.होममेड ब्लीच तयार आहे. जे तुम्हाला बाजारातील ब्लीच प्रमाणेच चमक देईल.
हे ब्लीच चेहऱ्यावर लावण्यासाठी टोनरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.आणि ही पेस्ट पातळ पसरवून लावा. साधारण दहा ते पंधरा मिनिटे सुकू द्या. सुकल्यावर, ब्लीच केलेली जागा पाण्याने धुवा. हे घरगुती ब्लीच जास्त काळ त्वचेवर राहू देऊ नकात. यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते.
घरगुती ब्लीच साफ करण्यासाठी कापूस वापरा. तसेच चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवा. ब्लीच काढून टाकल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करा. जेणेकरून त्वचेला ओलावा मिळेल आणि चेहऱ्यावर चमक दिसेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









