Dark lips: चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी बरीच मेहनत घेतली जाते. मात्र चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग असणाऱ्या ओठांकडे दुर्लक्ष होतं.विशेषकरून हिवाळ्यातच ओठांची जास्त काळजी घेतली जाते.मात्र इतर हंगामात ओठांकडे तितकसं लक्ष जात नाही.यामुळे ओठ काळे होतात. त्याचबरोबर धूम्रपान केल्याने तसेच अतिरिकत कॉफीचं सेवन केल्यामुळेही ओठ काळे पडू शकतात.म्हणूनच आज आपण यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
बीट
बीटचा रस तुमच्या ओठांना लावून ओठांचा मसाज करू शकता अथवा तुम्ही त्यामध्ये मध घालूनही तुमच्या ओठांना लावल्यास त्याचा योग्य परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल. रोज रात्री झोपताना हा रस तुमच्या ओठांना लावा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ओठ स्वच्छ गार पाण्याने धुवा. तुम्हाला नैसर्गिक गुलाबी रंग ओठांना आलेला दिसून येईल.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईलचे 2-3 थेंब रोज ओठाला लावा. त्यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा कमी होईल आणि तुमच्या ओठांना हवा असणारा ओलावादेखील मिळेल.यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहायला मदत मिळते.
लिंंबाचा रस
लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब ओठावर लाऊन मसाज करावा. त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. रात्री झोपताना लिंबाचा रस ओठांना लावून ठेवलात आणि साधारण अर्धा तासाने ओठ स्वच्छ केलेत तरीही याचा चांगला परिणाम होऊ शकतो.
बटर
बटर अर्थात लोण्याचा वापर हा ओठांचा नैसर्गिक रंग परत आणण्यासाठी करता येऊ शकतो. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही ओठांवर बटर लावा. घरी केलेलं लोणी असेल तर जास्तच चांगलं. यामुळे तुमचे ओठ खूपच सुंदर होतात.
तिळाचे तेल
रात्री झोपण्यापूर्वी तिळ्याच्या तेलाचे काही थेंब तुम्ही तुमच्या ओठाला लावा. असं रोज करा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.
गुलाबाच्या पाकळ्या
गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या दुधात घालाव्यात आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठावर लाऊन काही वेळ तशीच ठेवा. दूध तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतं. तर गुलाबाच्या पाकळ्यांमुळे तुमचे ओठ गुलाबी आणि आकर्षक दिसण्यास मदत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









