बेळगाव वनविभागाच्या पथकाची कारवाई : पाचजणांना अटक : गुन्हा दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील वनविभागाच्या भरारी पथकाने काळविटांची तीन कातडी जप्त केली आहेत. राणेबेन्नूर येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 15 लाखांना या कातडय़ांची विक्री केली जात होती.
त्यागराज लक्ष्मण लमाणी (रा. कज्जरी, ता. राणेबेन्नूर), गुरुनाथ बसवराज ऐराणी (रा. राणेबेन्नूर), बिराप्पा नागाप्पा मेडलेरी (रा. देवरगुड्ड, ता. राणेबेन्नूर), तिरुकप्पा मरिअप्पा गोडेर (रा. बुडाप्पनहळ्ळी, ता. बॅडगी), नागाप्पा द्यामाप्पा हरिजन (रा. बरडी, ता. हावेरी) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
त्यांच्याजवळून काळविटांची तीन कातडी, वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या चार फासक्मया, एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाच्या प्रमुख सीमा गर्ग, बेळगाव विभागाचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी मंजुनाथ चव्हाण, शंकर कल्लोळीकर आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षणाधिकारी सुरेश तेली, व्ही. डी. हुद्दार आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या सर्व पाच जणांवर वन्यजीवी संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या कारवाईत ममता अगडी, डी. आर. हणजी, आय. एम. अक्की, मल्लिकार्जुन मडिवाळर, शरणबसवेश्वर हतर्की, रशिद माणिकभाई आदींनी भाग घेतला असून राणेबेन्नूर येथील काळविट वन्यधाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱयांनीही या पथकाला साथ दिली.









