शशी कपूर यांचा नातू मुख्य भूमिकेत
शशी कपूर यांचा नातू जहान कपूरने 2022 मध्ये ‘फराज’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता तो ‘ब्लॅक वॉरंट’द्वारे ओटीटीच्या जगतात एंट्री करत आहे. याचा जबरदस्त ट्रेलर सादर करण्यात आला असून प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. जहान कपूर यात तिहार तुरुंगात जेलर असलेल्या संजय गुप्ता यांच्या भूमिकेत आहे. हे काम करत असताना अनेक आव्हाने समोर उभी ठाकत असल्याचे आणि राजकारण अन् कटाला सामोरे जावे लागत असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जहान कपूरसोबत राहुल भट, परमवीर सिंह चीमा, अनुराग ठाकूर आणि सिद्धांत गुप्ता समवेत राजश्री देशपांडे, तोता रॉय चौधरी आणि राजेंद्र गुप्ता हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवानी आणि सत्यांशु सिंह यांनी केली आहे. याचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे. तर कहाणी सत्येंशु सिंह आणि अरकेश अजय यांनी लिहिली आहे. हा चित्रपट सुनील गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांच्या पुस्तकावर आधारित आहे.









