Devendra Fadnavis : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज उत्थानाच केलेले कार्य जगाच्या इतिसामध्ये सोन्यानं लिहून ठेवलं आहे. जगात ज्या व्यक्तीची जयंती सर्वाधिक ठिकाणी साजरी केली जातेय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरीकाला समानतेचा अधिकार दिला. आज जगातील 5 वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था भारत झालीय. याचे कारण बाबासाहेबांनी दिलेले भारताचे संविधान आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज ते मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी 100 वर्षापूर्वी काळ्या पैशाविषयी बाबासाहेब काय म्हणाले होते याची आठवण करून दिली.
डॉ. आंबेडकर यांनी 100 वर्षापूर्वी ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ हे पुस्तक लिहिलं. १०० वर्षांनी आज आपण या पुस्तकात डोकावून पाहतो, त्यावेळी लक्षात येतं की, ही व्यक्ती किती द्रष्टी होती.” आमच्या पैशाचं, रूपयाची अडचण काय आहे. त्यावर काय उपाययोजना करता येईल, काळ्या पैशातून कस बाहेर येता येईल या प्रत्येक गोष्टीचं विवेचन 100 वर्षापूर्वी त्यांनी लिहून ठेवलं होते अस कौतुकही फडणवीस यांनी केलं.
समाजात समता स्थापन करण्याकरिता त्यांनी आंदोलन केलं. आपल्याच समाजामध्ये काही लोकं हे स्वत:ला मोठ समजत होते. आणि इतरांना माणूसकीची वागणूक ही देत नव्हते. अशाकाळात मानवतेचा संदेश घेऊन समतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला . याठिकाणी कोणीही जन्माने नाही तर कर्माने मोठ होण्याची संधी प्रत्येकाला आहे. असा संदेश त्यांनी दिला. हा मार्ग त्यांनी दाखवला. याच मार्गाने चालण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









