Nagpur Black Magic Murder Case : : अंद्धश्रद्धेतून म्हैसाळमध्ये ९ जणांचा बळी गेलेली घटना ताजी असतानाच आज नागपुरमध्ये सहा वर्षाच्या मुलीची तिच्या आईवडिलांकडून बेल्टने मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या सुभाषनगर भागात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेतील संशियीत आरोपी आई-वडिल आणि तिच्या मावशीला ताब्यात घेत अटक केली आहे. त्यानंतर सल्ला देणाऱ्या भोंदूबाबाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
सहा वर्षाच्या मुलीच्या वागण्यात मागील काही दिवसापासून बदल जाणवत होते. औषधोपचार केल्यानंतरही तिच्यात फरक पडला नव्हता. यामुळे तिच्या आई-वडिलांनी भोंदू बाबांची भेट घेतली. यावेळी त्या मुलीला भूतबाधा झाल्याचा संशय असल्याचे भोंदूबाबाने सांगितले. त्यामुळे त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी बेल्टने जबर मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्याही मारण्यात आल्या. चिमुकलीला मार सहन न झाल्यामुळे ती निपचित पडली होती. त्यानंतर आईवडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. भूतबाधा झाल्याचा संशय निष्पाप मुलीच्या जिवावर बेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








