ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अकोला-खामगाव मार्गावरील शेळद फाटय़ावर मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवत जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. बावनकुळे अकोला येथे संवाद यात्रेसाठी जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
देवानंद साबळे, गोपाल पोहरे, प्रशांत गायकवाड विष्णू अरबट ऋषिकेश साबळे, अंकित डीवरे अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांची नावे आहेत. या सहा जणांसह अन्य काहींनी बावनकुळे यांचा ताफा जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवत युती सरकारविरोधी घोषणा दिल्या. यावेळी सर्व आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. पोलिसांना या निषेध आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेत बाळापूर पोलीस ठाण्यात आणले.








