सेवन केल्याने वाढते माणसाचे आयुष्य
तुम्ही पांढऱया रंगाची अंडी पाहिली असतील. परंतु कधी काळय़ा रंगाची अंडी पाहिली आहेत का? जपानमध्ये काळय़ा रंगाची अंडी मिळतात. कूरो टमागोला काळय़ा रंगाची अंडी म्हटले जाते. जपानमध्ये ओवाकुदानी नावाची ग्रेट बॉइलिंग व्हॅली असून ती माउंट हकोने येथ आहे. 3 हजार वर्षांपूर्वी ज्वालामुखी विस्फोटामुळै ही व्हॅली तयार झाली होती. येथे झालेला विस्फोट अत्यंत मोठय़ा तीव्रतेचा असल्याने या भागात उकळत्या पाण्याची अनेक छोटी-छोटी तलावं निर्माण झाली आहेत. येथील लोक याच तलावांमध्ये अंडी उकडली जातात, ज्यांचा रंग मग काळा होत असतो.
या काळय़ा अंडय़ांना कूरो टमागो म्हटले जाते. ओवाकुदानीच्या उकळत्या पाण्यात उकडविलेल्या या काळय़ा अंडय़ांचे सेवन केल्यास आयुष्य 7-8 वर्षांनी वाढत असल्याचे मानले जाते. या तलावांमधील पाण्यात सल्फर मोठय़ा प्रमाणात आहे. याचमुळे पाण्यात सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फाइड तयार होते. अंडय़ाच्या आवरणाशी याचा संपर्क होताच त्याला काळा रंग प्राप्त होत असतो. या अंडय़ांमधून मग सल्फरचा गंध प्राप्त होतो तसेच चव देखील तशीच होत असते.
अंडय़ांना मोठय़ा संख्येत याच पाण्यात उकडविले जाते आणि मग त्यांना धातूच्या मोठय़ा क्रेटमध्ये भरले जाते. त्यानंतर एक तासापर्यंत पाण्यात ठेवण्यात येते. या पाण्याचे तापमान सुमारे 80 अंश सेल्सिअसपर्यंत असते. यानंतर त्यांना 100 अंश सेल्सिअसच्या तापमानात 15 मिनिटांसाठी स्टीम करण्यात येते. यामुळे या अंडय़ांना काळा रंग प्राप्त होतो. लोकांना अशाप्रकारची 5 अंडी खरेदी करण्यासाठी 300 रुपये खर्च करावे लागतात.