आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात वजन नियंत्रणात ठेवणं हे खूपच जिकरीचं काम आहे. पण या सर्वात मोठ्या समस्येचा उपाय म्हणजे ब्लॅक कॉफी. तुम्ही व्यायाम करत असल्यास, त्याआधी अर्धा तास तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम हे 50 टक्के वाढतं आणि तुमच्या शरीरातील आणि नाभीवरील चरबी कमी होण्यासाठी याची मदत होते. तुमची चरबी कमी करण्यासाठी तुमची नर्व्हस सिस्टिम व्यवस्थित चालवण्याचं काम ब्लॅक कॉफी करते.
कॉफी हे असं पेय आहे जे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजंतवानं करतं. बऱ्याच जणांना कॉफी प्यायल्यानंतर व्यवस्थित जाग आल्यासारखी वाटते. काहींना तर कॉफीच्या वासानेच बरं वाटतं. कॉफी दुधातून पिण्यापेक्षा ब्लॅक कॉफीचे (Black Coffee) अनेक फायदे आहेत. ब्लॅक कॉफीला नेहमीच हेल्दी मानलं जातं. या कॉफीमध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच कमी असतं. तसंच यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्वही असतात. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास, तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. मेंदू तल्लख ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा राहाते. तसंच याचे अनेक फायदे आहेत जे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
तणाव कमी
कॉफीमध्ये असणारं कॅफेन तुमचा नियमित तणाव कमी करण्यास फायदेशीर ठरतं. आजकाल प्रत्येक क्षणी माणसाला तणावाला सामोरं जावं लागतं. तुमचा मूड चांगला करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते. यातील कॅफेन तुमच्या हार्मोन्समध्ये ऊर्जा निर्माण करून तुमचा मूड चांगला राहण्यासाठी मदत करतात. तसंच तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही ब्लॅक कॉफीमधील कॅफेनचा उपयोग होतो. पण याचं अतिसेवन करू नये. त्यामुळे तुमच्या शरीराला हानीही पोहचू शकते. नैराश्यातून बाहेर येण्यासाठीही याचा उपयोग होतो
सौंदर्य खुलवण्यासाठी
कॉफीचा उपयोग पिण्यासाठी आणि आपला तणाव दूर करण्यासाठी अथवा आरोग्यासाठी चांगला आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत असतं. पण ब्लॅक कॉफीचा उपयोग आपल्याला आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करता येऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे जर ब्लॅक कॉफीचा वापर केलात तर तुमची त्वचाही अधिक तजेलदार होऊ शकते आणि तुमच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडते. तुम्ही हे उपाय घरच्या घरी करू शकता.
डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे काढून टाकण्यासाठी
डोळ्यांखाली निर्माण झालेली काळी वर्तुळं आणि सूज घालवण्यासाठी कॉफीचा चांगला उपयोग होतो. डिहायड्रेशन, अलर्जी, झोप न होणं या गोष्टी डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यास कारणीभूत ठरतात. कॉफीमधील असलेले कॅफेन या गोष्टी नष्ट करण्यास मदत करतात. ब्लॅक कॉफीमध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी काळे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
कसा करावा वापर
2 चमचे कॉफी पावडर, 1 चमचा पाणी घालून मिक्स करून घ्या
हे नीट तुमच्या डोळ्याखाली निर्माण झालेल्या काळ्या डागांवर लावा
अर्धा तास तसंच राहू द्या मग गार पाण्याने चेहरा धुव
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









