बेळगाव : महांत भवन, महंतेश नगर,बेळगाव येथे कराटेची ब्लॅक बेल्ट परीक्षा पार पडली या परीक्षेत एकूण 90 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत टॉप तीन ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांनी यश संपदान केले. या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली. या कठीण परिश्रमातून आर्यनसिंह रजपूत, शिवम मुनोळी, आणि अभिषेक लोहार या विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील तीन ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक परशुराम काकती यांचे प्रशिक्षण लाभत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. विनोद मेत्री (शरीर सौष्ठव स्पर्धा थायलंड सुवर्ण पदक विजेते),डॉ. सुवर्णलता बनसोडे (एचओडी आणि समन्वयक आरएल सायन्स इन्स्टिट्यूट बेळगाव.),श्री. महेंद्र कलरा (केंद्रीय विद्यालयचे प्राचार्य),श्री. प्रणेश होणवाड (इन्स्पायर फाउंडेशनचे अध्यक्ष),श्री.गजेंद्र काकतीकर (कराटे मास्टर)उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग.काकतीकर व प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार,विजय सुतार, नताशा खानापूरकर, पिंटू पाखरे, हरिष सोनार, विनायक दंडकर, पार्थ पाटील, साहिल काकती आणि सर्व ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









