बेळगाव : बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या फ्लाईंग फिट स्पोर्ट्स अकॅडेमी कराटे (ब्लॅक बेल्ट) स्पर्धेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणारा कराटेपटू समर्थ मनोहर बडवाण्णाचे यांची ब्लॅक बेल्टमध्ये निवड झाली. त्याला प्रशिक्षण म्हणून विनायक मोरे आणि चेतन मोरे यांचे मोलाचे प्रशिक्षण मिळाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय लेफ्टनंट कर्नल पवनकुमार शर्मा इंडियन आर्मी आणि इरगौडा पी. पाटील प्रिन्सिपल संत संस्कार इंटरनॅशनल स्कूल उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये एकूण कर्नाटकमधील 30 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत विजेत्या बडवाण्णेचे याला पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वडील मनोहर बडव्वाण्णाचे व आई मिलन बडवाण्णाचे यांचे प्रोत्साहन लाभले.
Previous Articleरोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय
Next Article गोवन्स सीए, टिळकवाडी एफए संघ विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









