कणकवली/प्रतिनिधी
ओटव सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रूहिता तांबे यांना 264 मते मिळाली. तर कविता तांबे यांना 85 मते मिळाली.प्रभाग एकमध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाlच्या दीक्षा जाधव यांना 103 मते मिळाली. तर कविता तांबे यांना 19 मते मिळाली. नोटा 3 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक तीनमधील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या वैष्णवी गावकर यांना 85 मते मिळाली. तर अनुष्का तांबे यांना 32 मते मिळाली. नोटा तीन मते मिळाली. दुसऱ्या जागेसाठी भाजपच्या लता तेली यांना 79 मते तर गार्गी गावकर यांना 39 मते मिळाली, नोटा दोन मते मिळाली.









