सातारा शहर भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर
सातारा : मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांच्या परवानगीने भाजपा सातारा शहर (मध्य) मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप सातारा शहरच्यावतीने देण्यात आली.
या कार्यकारिणीमध्ये शहराध्यक्षपदी अविनाश खर्शीकर यांची निवड करण्यात आली असून कार्यकारिणीत सरचिटणीसपदी अमोल टकले, दीपक क्षीरसागर, उपाध्यक्षपदी पंकज लाहोटी, विजय नायक, अमर बेंद्रे, अश्विनी पुजारी, हर्ष कोरे, उपाध्यक्ष मंगेश गोगावले, उपाध्यक्ष अक्षय पगारी, उपाध्यक्ष हर्ष कोरे, प्रशांत जोशी, चिटणीसपदी निलेश चोरगे, कैलास सुतार, शुभंकर चव्हाण, नितीन बामणे, अंजली त्र्यंबके, अजय झुटिंग, नेहा खैर, गौरव कासट,
महिला मोर्चा सोनिया शिंदे, युवा मोर्चा प्रतीक शिंदे, ओबीसी मोर्चा राजू गोरे, कामगार मोर्चा संदीप वायदंडे, सांस्कृतिक आघाडी प्रज्ञा लाटकर, उद्योग आघाडी प्रशांत जाधव, भटके विमुक्त आघाडी वीरसिंग परदेशी, वैद्यकीय आघाडी डॉ. संजयकुमार कोरे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी विजयकुमार नाफड, व्यापारा आघाडी स्वप्निल लूणीया, कायदा आघाडी एड. शिवप्रसाद वाघमोडे, ग्रामविकास व पंचायत राज आघाडी सचिन क्षीरसागर, दिव्यांग आघाडी चैतन्य जोशी, जैन प्रकोष्ट खुशाल बोहरा, फ्रेंड्स ऑफ बीजेपी प्रकोष्ट धनंजय पारखी, राजस्थानी आघाडी पुष्कर वैष्णव यांची निवड करण्यात आली आहे.









