निवडणूक कार्यालयावरील मोर्चा अडविला
पणजी : संविधानावर हल्ला होत असताना विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून सत्तेचा उघड दुऊपयोग होत असून भाजप सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे. त्यामुळे भारताची लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. मतदार यादीत बोगस मतदारांची नावे घुसडविण्यात आल्याचे पुरावे सापडल्यानंतर काँग्रेसने देशभरात आंदोलने आरंभली आहेत. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीनिवडणूक कार्यालयावरील मोर्चा अडविलाय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि इंडि आघाडीच्या खासदारांना अटकही करण्यात आली. या सर्वांचा निषेध म्हणून मंगळवारी पणजीत काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते.
पक्षाचे कार्यकर्ते राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाणार होते. त्यानुसार काँग्रेस हाऊसकडून पोलिस मुख्यालयासमोरून मोर्चा अल्तिनोकडे निघाला असता पोलिसांनी तो अडविला व निदर्शकांना ताब्यात घेतले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अल्टन डिकॉस्टा, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिक्षा खलप, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे कार्य करावे आणि ‘मतचोरी’ला थांबवावे, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नेत्यांनी पोलिसांचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी निवडणूक आयोग ही भाजपची ‘शाखा’ असल्याप्रमाणे काम करत आहे, असा आरोप केला.









