BJP’s plan to end the Shinde group – Anarojin Lobo
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला संपवण्याच्या दृष्टीने डाव आखत आहेत याची प्रचिती सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवडीत दिसून आली . खरंतर तज्ञ संचालकांची निवड प्रक्रिया आणि मतदान प्रक्रिया होणे हे खूप वेदनादायी आहे . भाजपने दिलेला शब्द पाळलेला नाही आणि चोरावर मोर होण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने या तज्ञ संचालक निवडीत पूर्णपणे दादागिरी केली. त्यामुळे या खरेदी-विक्री संघामध्ये आम्ही भाजप विरोधीच भूमिका घेणार आहोत. भाजप ज्या पद्धतीने राजकीय डाव आखत आहेत या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानी बाब घातली जाणार आहे. यापुढे भाजप सोबत कसे वागायचे आणि भाजपला दे धक्का कसा द्यायचा याचा फॉर्मुला आमच्याकडे आहे . भाजप ज्या पद्धतीने वागत आहे ते पाहता यापुढे युतीबाबत विचार केला जाईल. आणि त्यांच्याबाबत सावधगिरीनेच पावले टाकली जातील असे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे महिला नेत्या तथा सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या गटनेत्या श्रीमती अनारोजन लोबो, जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे , व्हाईस चेअरमन राजन रेडकर आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले .
सावंतवाडी / प्रतिनिधी









