दिल्लेत 8 डिसेंबरपासून भाजपची परिवर्तन यात्रा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष 8 डिसेंबरपासून परिवर्तन यात्रा सुरू करणार आहे. जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी काढण्यात आलेली ही यात्रा 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दिल्लीतील सर्व 7 लोकसभा जागांवर याचे आयोजन केले जाईल. केवळ बारा दिवसात लोकसभेच्या सर्व 7 जागांच्या क्षेत्रात ही परिवर्तन यात्रा फिरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली भाजप लवकरच पत्रकार परिषद घेऊन यात्रेचा तपशील आणि अधिकृत घोषणा करणार आहे. पुढील वर्षी 2025 च्या सुरुवातीला दिल्ली विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम रंगण्याची चिन्हे असून आतापासून राजकीय









