विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारार्थ खानापूरात प्रचार रॅली
खानापूर : देशात ज्या ज्या राज्यात काँग्रेस व विरोधकांचे सरकार आहे. तेथे हिंदू समाजातील विविध वर्गांचा अपमान केला जात आहे. माहिलांवर अत्याचार व अन्याय केला जात आहे, त्यामुळे माfहलांची सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानासाठी भाजप सरकारची गरज असल्याचं, मत केंद्रीय माfहला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री स्मृति इराणी यांनी केले. खानापूर येथील भाजपाचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित खानापूर शहरातील प्रचार रॅलीत त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर शांतिनिकेतन शाळेच्या आवारात झालेल्या सभेत त्या प्रमुख प्रचारक म्हणून बोलत होत्या.

इराणी म्हणाल्या, यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने मतांसाठी केवळ विशिष्ट समाजासाठीच आरक्षण दिले होते. परंतु समाजातील दलित, शोषित, आदिवासाRना आरक्षणापासून दूर ठेवले होते. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृlवाखाली सरकार आल्यानंतर प्रत्येक समाजासाठी दोन टक्के आरक्षण वाढवून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप सर्वांचा विचार करणारा पक्ष असल्याने सर्वांनी आपली मते भाजपच्याच उमेदवारांना देऊन त्यांना बहुमताने निवडून आणावे असे आवाहन हि केले. गांधी घराण्याच्या पारंपाfरक अमेठी मतदारसंघात चाळीस वर्षात कोणताहि विकास झाला नव्हता. तो भाजपच्या सरकारने केला असल्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. काँग्रेस आमदार खासदार झाल्याने अमेठीला 40 वर्षे लुटण्यात आले. आता खानापूरला लुटायला देऊ नका, अशी घणाघाती टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
यावेळी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी एकवेळ संधी द्या अशी विनंती मतदारांना केली.
माजी आमदार अरविंद पाटील यांनीहि यावेळी काँग्रेसवर टीका केली.
यावेळी गोवातील भाजप नेत्या सुलक्षणा सावंत, खानापूर प्रभारी उज्वला बडवानाचे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनीलजी, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, वासंती बडगे, सुरेश देसाई, सुवणा& पाटील, मंजुळा कापसे, ज्योतिबा माने, किरण येळूरकर, बाबुराव देसाई, प्रमोद देसाई, सुभाष शेट्टी, विजय कामत उपस्थित होते.









