आचरा प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत सरपंच राजश्री कोदे यांनी अडीज वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पक्षीय धोरणानुसार राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या सरपंच पदासाठीच्या जागेसाठी आज बुधवारी निवडून लागली होती. या सरपंचपदासाठी भाजपच्या नम्रता शंकर महांकाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल असल्याने भाजपच्या नम्रता महांकाळ यांची बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रियेच्यावेळी 11 पैकी 7 सदस्य उपस्थित होते. या सरपंचपदासाठीच्या झालेल्या निवडणूकिसाठी निवडणूक अधिकारी म्हणून संजय गोसावी ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर यांनी काम पाहिले.
सरपंच निवडीवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालूकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सरपंच महेश मांजरेकर, बाबा परब, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, सदस्य महेंद्र मांजरेकर शशिकांत नाटेकर, सानिका चिंदरकर, दुर्वा पडवळ, जान्हवी घाडी रिया घागरे, माजी सभापती हिमाली अमरे, संतोष गावकर, देवेंद्र हडकर, ग्रामस्थ उपस्थित होते.