कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय सत्ता मिळवणे हेच असते. लोकसेवा हा दुय्यम घटक असतो. देशात, राज्यात किंवा महानगरपालिकेत वर्षानुवर्षे एकाच पक्षाची सत्ता असताना दरवेळी निवडणुकीत भावी कामाचा जाहीरनामा प्रसिद्ध होतो आणि मतदार त्याला भूलतात. थोडक्मयात, सत्ताग्रहण केल्यानंतर जनतेला गोड बोलून कसे फसवू शकता, यावर त्या पक्षाचे भवितव्य असते. अर्थात, निवडणुका जिंकणे हे एक तंत्र असते, व्यूह असतो आणि डावपेचाचा भाग असतो. सध्या तरी या तीनही प्रकारात भाजप आघाडीवर आहे. म्हणूनच, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजप श्रे÷ाrंनी आणले आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी घरोबा करून भाजपचा धोबीपछाड केला. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिल्याचा दावा केला आणि भाजप-शिवसेना युती संपुष्टात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसह 50 आमदार फोडून उद्धव ठाकरेंना शह दिला. एवढय़ावरच त्यांचे समाधान झाले नाही. मुंबई महापालिकेवर दोन दशकांपासून शिवसेनेचा झेंडा फडकत आहे, तो खाली उतरवल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे भाजपने ठरवले आहे. वास्तविक, भाजपश्रे÷ाrंचे लक्ष्य मुंबईच आहे. महानगरस्तरावर ही महापालिका देशातील सर्वात मोठी आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न अशी आस्थापना आहे. भारतातील नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर, सिक्किम या राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. 2022-23 सालचे या मायानगरीचे बजेट 45 हजार कोटींहून अधिक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर राज्य करणे म्हणजे एखाद्या श्रीमंत राज्याची सत्ता चालवण्यासारखेच आहे. भाजपबरोबरच्या युतीच्या काळात, राज्याच्या राजकारणात शिवसेनेने दुय्यम भूमिका स्वीकारण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही, कारण मुंबईवरील त्यांची सत्ता अबाधित होती. भाजपनेही त्यात हस्तक्षेप केलेला नव्हता. मात्र, मुंबई पालिकेच्या येत्या निवडणुकीत ‘मिशन 150’चा नारा देऊन अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. मुंबईतील चाकरमानी आणि मराठी माणूस शिवसेनेच्या बाजूने आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची अस्मिता जागी केली आणि परप्रांतीयांचे आक्रमण मोडून काढले. मराठी माणसाला सर्वच ठिकाणी मान मिळू लागला. कालांतराने अनेक अमराठी भाषिकच शिवसेनेत सामील होऊ लागले. गुजराती बांधवांच्या कार्यक्रमात बाळासाहेब हिंदीमध्ये भाषण द्यायला लागले. त्याची कारणे वेगळी आहेत. मुद्दा आहे तो मराठीभाषिकांच्या शिवसेनाप्रेमाचा. उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष टिकवता आलेला नाही. बाळासाहेबांच्या पश्चात आणि त्यांच्या हयातीत अनेकांनी पक्ष सोडला. राज ठाकरे वगळता त्याचा फारसा परिणाम जाणवला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी स्वतःच ते उपभोगल्यामुळे पक्षात आणि त्यांना मानणाऱया मतदारांमध्ये फूट पडली आहे. अमित शहा यांनी या सगळय़ा गोष्टी हेरल्या आणि अगदी मोक्मयाच्या वेळी त्यांनी उद्धव यांच्या वर्मावर घाव घातला आहे. “उद्धव यांनीच विश्वासघात केला’’, “नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मते मागितली’’, “धोका देणाऱयांना योग्य शिक्षा दिली पाहिजे,’’ अशी शेलकी विधाने करून त्यांना डिवचले आहे.‘अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊ’, असा शब्द दिलेला नव्हता, याचाही पुनरुच्चार केला. एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन पुढची खेळी करताना निवडणुकीच्या मानसिकेतून कार्यकर्त्यांना आणि जनतेला बाहेर येऊ द्यायचे नाही, असा डाव भाजपने टाकला आहे. मुंबई महापालिकेतील एकूण 227 जागांपैकी 93 जागा शिवसेनेकडे तर 82 जागा भाजपकडे आहेत. काँग्रेसचे 31 नगरसेवक वगळले तर राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि अपक्षांची संख्या एकअंकीच आहे. काँग्रेसचा पाय आता आणखी खोलात शिरला आहे. राज ठाकरे यांना बरोबर घेतले तर मुंबई जिंकणे अवघड जाणार नाही, असे भाजपला वाटते. खरी शिवसेना कोणती हे कायदेशीररित्या सिद्ध होईल तेव्हा होईल, पण जनतेच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचे प्रेम आटलेले नाही. अर्थात महापालिका निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल. मतदारांचे सरासरी वय व संख्या आणि बाळासाहेबांना मानणाऱयांचे वय व संख्या यांचे गणित घातले तर भाजपचे पारडे जड होऊ शकते. याखेरीज मिठीसह ओशिवरा, दहिसर आणि पोईसर या नद्यांचे नाल्यात झालेले रुपांतर, दरवषी पावसाळय़ात पूरस्थितीचा अनुभव, त्यात जाणारे बळी, ते टाळण्यासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च, रोज होणारा वाहतुकीचा खेळखंडोबा, कचऱयाची समस्या, वाढती रोगराई या आणि अशा अनेक समस्या मुंबईकरांसमोर आहेत. तिथले सर्वसामान्य माणसांचे जीवनमान हलाखीचेच आहे. केवळ उपजीविकेसाठीच नाईलाजाने लोक मुंबईत राहतात, अशी परिस्थिती आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही शिवसेनेला या समस्यांवर तोडगा काढता आलेला नाही. याउलट दहिहंडीपासून गणेशोत्सवापर्यंत सार्वजनिक सण-उत्सवात सामान्य माणसाला गुंतवून मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्यात त्यांना यश आले आहे. एका आकडेवारीनुसार, मुंबईत 42 टक्के मराठीभाषिक आहेत, तर 19 टक्के गुजराती समाज आहे. साधारणपणे 33 टक्क्मयांपर्यंत हिंदी भाषिक आहेत. अशा स्थितीत मराठी टक्का भाजपकडे वळवणे हेच मोठे टास्क आहे. गुजरातीभाषिक मोदी-शहांच्या करिष्म्याने दीपलेले आहेत. त्यांना वळवणे कठीण नाही. एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या मदतीने ‘मिशन 150’ साध्य होऊ शकते. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी आपण दीडशे प्लसचे मिशन घेऊया, असे सांगून प्रतिआव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता कोणाचीही आली तरी सामान्य माणसांचे जगणे सुसह्य होत नसेल तर अशा राजकारणाला काहीही अर्थ नाही.
Previous Articleदेशातील सर्वात मोठा कार‘चोर’ जेरबंद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








