मतदार-कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा
बेळगाव : भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी शनिवारी सौंदत्ती तालुक्याचा दौरा केला. सौंदत्ती तालुक्यातील गावांना भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाजपला अधिकाधिक मतदान होईल, या दृष्टीने सौंदत्ती तालुक्यात प्रचाराला लागा, अशी सूचना शेट्टर यांनी कार्यकर्त्यांना दिली. शिवापूर येथील बसवेश्वर मंदिरमध्ये आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, मंडल अध्यक्ष इराण्णा चंदरगी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचार दौऱ्यात भाग घेतला होता. माडमगेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर सौंदत्ती तालुक्यातील इतर गावांमध्ये शेट्टर यांनी जोरदार प्रचार केला. यरगट्टी तालुक्यातून भाजपला मोठे मताधिक्य देऊ, असे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले.