निवडणुकीपासून दूर राहण्याचा ‘आप’चा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आम आदमी पक्षाने दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आतिशी आणि प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी आम आदमी पक्ष महापौर निवडणुकीपासून दूर राहणार असल्याची माहिती दिली. ‘आप’च्या या निर्णयामुळे महापौरपदी भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. आपच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांची घोषणा केली. पक्षाने इक्बाल सिंग यांना महापौर आणि जय भगवान यादव यांना उपमहापौरपदाचे उमेदवार केले आहे. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौर पदासाठी 25 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.









